‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:18 IST2025-10-17T07:18:34+5:302025-10-17T07:18:48+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने पवार यांची ईडी मुंबई झोनल ऑफिसकडून करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवली. त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्याबाबत चव्हाण यांनी माहिती दिली.

‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ईडीने अटक केलेल्या वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांचा कथित गुन्ह्यातील अवैध उत्पन्नाशी संबंध असल्याचा पुरावा ईडीकडे नाही. पवार २०२२ मध्ये वसई- विरार महापालिकेचे आयुक्त झाले. कथित गैरकृत्ये झाल्यानंतर १५ वर्षांनी त्यांनी पदभार स्वीकारला होता, याकडे पवार यांचे वकील अॅड. डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी लक्ष वेधले. ईडीची कारवाई कशी चुकीची व बेकायदा होती, यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचे चव्हाण म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाने पवार यांची ईडी मुंबई झोनल ऑफिसकडून करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवली. त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्याबाबत चव्हाण यांनी माहिती दिली.
पवार यांना १३ ऑगस्ट २०२५ रोजी ईडीने वसई-विरार भूमी घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली होती. हे प्रकरण २००८ ते २०१० दरम्यान बांधण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारतींच्या विक्रीशी संबंधित आहे.