अनिल अंबानींच्या दारात बसणार फेरीवाले...

By Admin | Updated: April 8, 2015 03:38 IST2015-04-08T03:38:33+5:302015-04-08T03:38:33+5:30

फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्राच्या प्रस्तावित यादीमुळे पदपथावरून चालणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे मुंबईतील प्रसिद्ध व नामवंत

Anil Ambani's hiding at the door ... | अनिल अंबानींच्या दारात बसणार फेरीवाले...

अनिल अंबानींच्या दारात बसणार फेरीवाले...

मुंबई : फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्राच्या प्रस्तावित यादीमुळे पदपथावरून चालणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे मुंबईतील प्रसिद्ध व नामवंत व्यक्तींच्या डोक्यालाही ताप होणार आहे़ नवीन यादीनुसार वांद्रे पाली हिल येथे निवासस्थान असलेले बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर व उद्योगपती अनिल अंबानी यांच्या दारातच फेरीवाले बस्तान बसविण्याची शक्यता आहे़
राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार मुंबईतील फेरीवाल्यांचे नियोजन केले जात आहे़ यावर गेले काही महिने शहर नियोजन समितीमार्फत सुनावणीदेखील सुरू होती़ मात्र फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावेळी सरसकट शिरगणती झाल्यामुळे सर्वत्र टीकेची झोड उठली होती़ अखेर अनेक वादानंतर फेरीवाल्यांची यादी तयार करण्यात येत आहे़ परंतु प्रस्तावित यादीमुळेही अनेक वाद उभे राहण्याची चिन्हे असल्याचे मत स्थानिक नगरसेवक आसिफ झकारिया यांनी व्यक्त केले आहे़ अर्थसंकल्पात आयुक्त सीताराम कुंटे यांनी नागरिकांसाठी पदपथ सुरक्षित करण्याची घोषणा केली़ मात्र पाली हिल भागात पदपथ अस्तित्वातच नसताना तेथे पदपथ दाखवून फेरीवाला क्षेत्र सुचविण्यात आले आहे़ वांद्रे पाली हिल पालिका जलाशयाबाजूला असलेले बॉलीवूड स्टार ऋषी कपूर यांचे निवासस्थान व उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू आहे़ तेथे फेरीवाला क्षेत्र दाखविले आहे.

Web Title: Anil Ambani's hiding at the door ...