मराठी शाळांच्या पाडकामाविरोधात संताप, मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये आंदोलन : पालकांसह स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:18 IST2025-11-13T14:17:54+5:302025-11-13T14:18:14+5:30
Mumbai Marathi School: मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून त्यांचे पाडकाम सुरू करण्याच्या कारवाईविरोधात बुधवारी धारावीत आंदोलन करण्यात आले. मराठी अभ्यास केंद्र यांच्या नेतृत्वाखाली ९० फुटी रोडवरील कामराज मेमोरियल शाळेमागे झालेल्या आंदोलनात स्थानिक रहिवासी, पालक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मराठी शाळांच्या पाडकामाविरोधात संताप, मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये आंदोलन : पालकांसह स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग
मुंबई - मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून त्यांचे पाडकाम सुरू करण्याच्या कारवाईविरोधात बुधवारी धारावीत आंदोलन करण्यात आले. मराठी अभ्यास केंद्र यांच्या नेतृत्वाखाली ९० फुटी रोडवरील कामराज मेमोरियल शाळेमागे झालेल्या आंदोलनात स्थानिक रहिवासी, पालक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पालिकेने काही सुस्थितीत असलेल्या शाळा पाडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप यावेळी मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी केला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला.
आमची मुले माहीम रोड पालिकेच्या शाळेत जात होती. आता शाळेची इमारत धोकादायक असल्याचे सांगितले जात असून, ती पडून पुन्हा बांधणार आहेत. मात्र, येथील मुलांची शाळा गेली. सायन येथे पाच किलोमीटर लांब मुले चालत कशी जातील? पालिकेचा शिक्षण विभाग स्वतःच्या शाळांकडे दुर्लक्ष करीत आहे.
- डॅनियल फारुकी, पालक, धारावी
पालिकेच्या मराठी शाळा बुलडोझरशाहीद्वारे पाडल्या जात आहेत; मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. मुंबईच्या जमिनी जशा नोकरशहा, लोकप्रतिनिधी यांनी गिळल्या तसा प्रकार आम्ही होऊ देणार नाही.
- डॉ. दीपक पवार,
अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
महापालिकेच्या मराठी शाळांच्या इमारती स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक दाखवल्या जातात. मात्र, स्वतंत्र सल्लागार कंपन्यांच्या अहवालांनुसार त्या सुरक्षित आहेत. मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे शासन आणि महापालिकेचे प्राधान्य असायला हवे; पण दुर्दैवाने तसे होत नाही.
- चिन्मयी सुमित,
अभिनेत्री, मराठी शाळांच्या सदिच्छादूत
‘स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल नागरिकांपुढे ठेवा’
‘मराठी शाळा वाचवा,’ ‘विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवा,’ ‘पालिकेची बुलडोझरशाही बंद करा’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. शाळांच्या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महापालिका प्रशासनाने नागरिकांपुढे ठेवावा. इमारतींच्या पाडकामाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी मराठी अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आली. यावेळी मराठी शाळा वाचवण्यासाठी निदर्शने करण्यात आली.
दरम्यान,