VIDEO: मुंबईतले खड्डे अन् 'पुष्पा-२' गाण्याची 'ती' स्टेप; व्हिडिओ तुफान व्हायरल; कमेंट्सचा 'पाऊस'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:31 IST2024-06-28T13:30:10+5:302024-06-28T13:31:45+5:30
पावसाळा आणि मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे हे समीकरणच झाले आहे. खड्डे घेऊन नेमेची येतो पावसाळा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

VIDEO: मुंबईतले खड्डे अन् 'पुष्पा-२' गाण्याची 'ती' स्टेप; व्हिडिओ तुफान व्हायरल; कमेंट्सचा 'पाऊस'!
मुंबई
पावसाळा आणि मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे हे समीकरणच झाले आहे. खड्डे घेऊन नेमेची येतो पावसाळा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रस्त्यावरच्या खड्ड्यांवरुन मग सोशल मीडियातील रिल्स सम्राटांच्या कल्पनाशक्तीलाही स्फुरण चढतं. असंच एक रिल सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. पुष्पा-२ सिनेमाच्या 'सामे' गाण्यातील हूक स्टेपवर एका तरुणीनं मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर लक्ष वेधलं आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी पुष्पा-२ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमातील 'सामे' गाण्याचीही चलती आहे. सामे गाण्यातील हूक स्टेपनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याच हूक स्टेपवर मुंबईतील एका तरुणीनं रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये डान्स केला आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जो तुफान व्हायरल होत असून पोस्टवर नेटिझन्सकडून कमेंटचा पाऊस पडत आहे.
सोशल करी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना रस्त्यावरुन असा प्रवास करावा लागतो, असं कॅप्शन देत 'सामे' गाण्याच्या स्टेपवर तरुणी खड्डे चुकवत डान्स करताना दिसून येते. या व्हिडिओवर नेटिझन्सही भरभरुन व्यक्त होत आहे. डान्स स्टेप्सचा अचूक वापर असं एकानं म्हटलंय. तर काहींनी तरुणीच्या कल्पनाशक्तीचं कौतुक केलंय. व्हिडिओला १ लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.