भाजपाच्या मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत भरला निवडणूक अर्ज
By मनोहर कुंभेजकर | Updated: October 14, 2022 16:55 IST2022-10-14T16:54:05+5:302022-10-14T16:55:15+5:30
Andheri East Assembly By Election: उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व शिंदे गटाचे युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत अंधेरी पूर्व,गुंदवली म्युनिसिपल शाळा ( मांजरेकर वाडी) या ठिकाणी आज दुपारी आपला निवडणूक अर्ज भरला

भाजपाच्या मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत भरला निवडणूक अर्ज
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - अंधेरी ( पूर्व ) विधानसभा मतदारसंघात येत्या दि,३ नोव्हेंबरला येथील दिवंगत आमदार कै. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होणार आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व शिंदे गटाचे युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत अंधेरी पूर्व,गुंदवली म्युनिसिपल शाळा ( मांजरेकर वाडी) या ठिकाणी आज दुपारी आपला निवडणूक अर्ज भरला. तत्पूर्वी त्यांची गुंदवली वरून सकाळी भव्य निवडणूक रॅली काढण्यात आली. यावेळी झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी नियंत्रणात आणली.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार,विधानपरिषदेचे भाजप गटनेते प्रवीण दरेकर,आमदार नितेश राणे,शिंदे गटाचे प्रवक्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व आमदार दिलीप लांडे,आमदार अमित साटम,माजी मंत्री कृपाशंकर तसेच हजारोंच्या संख्येने भाजप व शिंदे गटांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.