अमर शैला -मुंबई : अंधेरी (प) ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर या मेट्रोच्या उत्पन्न वाढीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाडे निर्धारण समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच केंद्र सरकारला त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील मेट्रो प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
एमएमआरडीएच्या अखत्यारितील महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) ३५.१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे संचालन केले जाते. या मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला होता.
ही मेट्रो मार्गिका सुरू होऊन दोन वर्ष उलटल्यानंतरही या मार्गावर अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या गाठता आलेली नाही. सध्या या मार्गावर दरदिवशी साधारणपणे २ लाख ७० हजार प्रवासी प्रवास करत असून ९ लाखांच्या अपेक्षित प्रवासी संख्येपासून ही मेट्रो अजून दूर आहे.
परिणामी मेट्रोचा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक होतो आहे. त्यातच मुंबई महानगरातील अन्य मेट्रो मार्गिकांचे भाडे एमएमआरडीएच्या मेट्रोपेक्षा अधिक आहे. परिणामी तोटा भरून काढण्यासाठी आता एमएमएमओसीएलकडून प्रवाशी भाडेवाढीचा विचार केला जात आहे.
एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत या मेट्रो मार्गिकेवर भाडेवाढ करण्यासाठी भाडे निर्धारण समिती नियुक्त करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली जाणार असून त्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचे प्रत्येकी एक सदस्य असतील. ही समिती सुधारित भाडे निश्चित करून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवेल, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मेट्रो ३ चे भाडे सर्वाधिकमुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर सध्या सर्वाधिक भाडे आकारले जात आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवर प्रती ३-१२ किमीसाठी २० रुपये भाडे आकारले जाते. त्याचवेळी मेट्रो ३ मार्गिकेवर ८-१२ किमी अंतरासाठी ४० रुपये भाडे आकारले जात आहे.
मेट्रो १ मार्गिकेवर ८ ते ११.४ किमी अंतरासाठी ४० रुपये आकारले जाते. मेट्रो २अ आणि ७ मार्गिकेवर ३६ ते ४२ किमी अंतरासाठी ७० रुपये भाडे आकारण्यात येत असताना मेट्रो ३ मात्र २५ किमीहून अधिक अंतरासाठी ७० रुपये आकारणार आहे.
कोणत्या मेट्रोचे भाडे वाढणार?अंधेरी (प) ते दहिसर मेट्रो २ अ - १८.६ किमी लांबीगुंदवली ते दहिसर मेट्रो ७ - १६.५ किमी लांबी
कोणत्या मेट्रो मार्गिकेवर किती भाडे? किमीनुसार मेट्रो २अ/ ७ मेट्रो ३०-३ ३.३३ ६.६७३-१२ १.६७ ३.३३१२-१८ १.६७ २.७८१८-२४ १.६७ २.५२४-३० १.६७ २.५३०-३६ १.६७ २.१५३६-४२ १.६७