Join us

Andheri Bridge Collapse: अस्मिता काटकर कोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 13:32 IST

अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नाही,अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नाही,अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. अस्मिता यांची प्रकृती खालावल्याने त्या कोमात गेल्या आहेत. आता त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्या कोमातून कधी बाहेर येतील हे सांगू शकत नाही, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश सुखदेव यांनी सांगितले. 3 जुलैला सकाळी पश्मिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ गोखले पूल कोसळला. या दुर्घटनेत पुलाच्या ढिगाऱ्याखाली अस्मित काटकर दबल्या गेल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली.

(Andheri Bridge Collapse: ढिगाऱ्यात अडकलेल्या अस्मिताला तिचे कुटुंबीयही ओळखू शकले नाहीत !)

दुर्घटनेच्या दिवशी नेमके काय घडले?

नेहमीप्रमाणे अस्मिता यांनी आपल्या 6 वर्षीय मुलाला अंधेरी पूर्वेकडील परांजपे विद्यालयात सोडले व आपल्या कामासाठी गोखले पुलावरुन जुहूच्या दिशेनं त्या पायी प्रवास करू लागल्या. काही समजण्याच्या आतच गोखले पुलाचा काही भाग कोसळला आणि  त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या. यानंतर तातडीनं त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून अस्मिता काटकर यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. 

ढिगाऱ्याखाली अडकल्यानं अस्मिता काटकर गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यांचे संपूर्ण शरीर सुजले होते. त्यांच्या डोक्यालादेखील गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. अखेर साडीच्या आधारावर अस्मिता यांची ओळख पटली आणि काटकर कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. 

  

 

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनामुंबईअंधेरी