Join us

... अन् बाप्पाच्या आगमनाने दुमदुमली मुंबापुरी; ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:24 IST

गणेश चतुर्थीला १२ दिवसांचा अवधी असला, तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमन सोहळ्यात धडाक्यात सुरुवात केली आहे.

मुंबई : गणेश चतुर्थीला १२ दिवसांचा अवधी असला, तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमन सोहळ्यात धडाक्यात सुरुवात केली आहे. रविवारची गर्दी टाळण्यासाठी शनिवारीच मोठ्या संख्येने चिंचपोकळी, करी रोड आणि परळ परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी ‘श्री’च्या मूर्ती मंडपाच्या दिशेने रवाना केल्या. दरम्यान, ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या बाप्पाच्या आगमन मार्गांमध्ये असलेल्या खड्ड्यांमुळे कार्यकर्त्यांना मूर्ती नेताना तारेवरची कसरत करावी लागली.श्रीकृष्ण जन्मामुळे रविवारीऐवजी शनिवारीच बहुतेक मंडळांनी गणेश आगमनाचा मुहूर्त साधला. त्यात गिरणगावचा राजा, कुलाब्याचा राजा, घोडपदेवचा राजा, काळेवाडी गणेशोत्सव मंडळ, खेतवाडी १२वी गल्ली अशा दक्षिण मुंबईतील नामांकित मंडळांचा समावेश होता. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मंडळांनी डीजेला बगल देत, यंदाही ढोल-ताशांना पसंती दिली होती.आगमन सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांना रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या आणि खड्ड्यांसह अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बाप्पाला घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचे चाक खड्ड्यांमध्ये अडकू नये, म्हणून रस्त्याच्या एका टोकापासून दुसºया टोकापर्यंत कार्यकर्ते ट्रॉली फिरवित होते. परिणामी, मुख्य मार्गांवरील वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र परळ, करी रोड, लालबाग, काळाचौकी आणि भायखळा परिसरात दिसले.‘गिरणगावचा राजा’च्या मूर्ती समितीचे प्रमुख अभिषेक गाडे म्हणाले की, डीजेला बगल देत विविध सार्वजनिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस असतो. यंदा ‘एक वही एक पेन’सारखा उपक्रम राबवून आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा हेतू आहे.क्रेप पट्ट्यांचा असाही वापरबाप्पाच्या आगमनाच्या वेळी फुलांची बरसात करण्याऐवजी बहुतेक मंडळांनी क्रेप पट्ट्यांचा वापर केल्याचे पाहायला मिळाले. फुलांच्या तुलनेत कमी खर्चात अधिक आकर्षक वाटत असल्याने, फुलांऐवजी क्रेप पट्ट्यांची उधळण केल्याचे मंडळांच्या पदाधिकाºयांनी सांगितले.फेटे आणि पारंपरिक वेशभूषाढोलपथकांसह आगमन सोहळ्यात सामील झालेल्या कार्यकर्त्यांनी परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होती. याउलट पुरुषांसह महिलांना घातलेले फेटे सोहळ्यास चार चाँद लावत होते.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई