Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विमानतळावर सोने-चांदीची प्राचीन काळातील नाणी जप्त; सीमा शुल्क विभागाने केली एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:06 IST

लंडन येथून एक प्रवासी व्हर्जिन अटलांटिकच्या विमानाने मुंबईत आला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली

मुंबई - मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन बांगलादेश प्रांतासाठी जारी केलेली सोन्याची नाणी विमानतळावर जप्त केली आहेत. या नाण्यांचे वजन १२.३७ ग्रॅम इतके आहे. 

शाह आलम दोन यांच्या नावाने ही नाणी त्यावेळी चलनात आणण्यात आली होती. याचसोबत कुशन राजवटीची सोन्याची ८ ग्रॅम वजनाची तसेच मुगल राजवटीतील अहमदाबाद येथून जारी केलेली चांदीची ११.४४ ग्रॅम वजनाची नाणीदेखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली आहेत. लंडन येथून एक प्रवासी व्हर्जिन अटलांटिकच्या विमानाने मुंबईत आला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या सामानात ही दुर्मीळ नाणी आढळली. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. 

नाणे तस्करीची शक्यतासीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आलेल्या प्रवाशाची चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीतून दुर्मीळ नाण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Airport: Ancient Gold, Silver Coins Seized; One Arrested

Web Summary : Customs seized East India Company gold coins and ancient silver coins at Mumbai Airport. A London-returned passenger was arrested for smuggling the rare coins. An investigation is underway.
टॅग्स :विमानतळसोनं