Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी हट्ट करते, म्हणून सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील भयावह प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 11:48 IST

मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. 

मुंबई : मुलगी हट्ट करते म्हणून सावत्र वडिलांनी आई घरात नसताना ६ वर्षांच्या मुलीला पट्ट्याने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता सांडशीने खासगी भागावर जखमा करून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बोरीवलीत समोर आली आहे. या घटनेने मुलीला मानसिक धक्का बसला आहे. अचानक हसत खेळत राहणारी मुलगी शांत झाल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेला संशय आला. तिने मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. 

सतर्कतेमुळे घटना उघडकीस

महिला पोलिस शिपायाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. गुजराती कुटुंबात राहणारी ६ वर्षीय मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहण्यास आहे. डिसेंबर २०२२ ते २८ मार्चपर्यंत सावत्र वडिलांकडून तिला मारहाण करत याबाबत कुणाकडे सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्कतेमुळे घटना समोर आली. पोलिसांनी मुलीसह आईचे ट्रामा केअरमध्ये समुपदेशन केले. तेथे मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच तिने वडिलांच्या विकृतीला वाचा फोडली. 

टॅग्स :लैंगिक शोषणलैंगिक छळमुंबई