Join us

Amravati: मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे गठन, अध्यक्षपदी मयुरा देशमुख

By गणेश वासनिक | Updated: October 30, 2023 18:54 IST

Amravati News: मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या अध्यक्ष म्हणून मयुरा देशमुख, महासचिव वनिता अरबट, कार्याध्यक्ष सुजाताई ठुबे, कोषाध्यक्ष शारदा जाधव, उपाध्यक्ष अनुजा भोसले आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

- गणेश वासनिकअमरावती - मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे गठन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या अध्यक्ष म्हणून मयुरा देशमुख, महासचिव वनिता अरबट, कार्याध्यक्ष सुजाताई ठुबे, कोषाध्यक्ष शारदा जाधव, उपाध्यक्ष अनुजा भोसले आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनात व केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेत सिंदखेडराजा येथे शनिवार, २८ ऑक्टोबर राेजी बैठक पार पडली. यात मार्गदर्शक अर्जुन तनपुरे उपाध्यक्ष अरविंद गावंडे, विजय ठुबे, पुरुषोत्तम कडू, सोमनाथ लडके यांच्या उपस्थितीत जिजाऊ ब्रिगेडची आंतरराष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या स्थापनेपासून राज्यात आणि राज्याबाहेरसुद्धा संघटन बांधणीत अग्रेसर असलेल्या अमरावतीच्या मयुरा देशमुख यांच्यावर जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :मराठाअमरावती