अमिताभ आमचे भारतरत्न - ममता बॅनर्जी; बिग बी यांना बांधली राखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 07:14 IST2023-08-31T07:04:09+5:302023-08-31T07:14:08+5:30
इंडिया आघाडीच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी त्या मुंबईत आल्या आहेत.

अमिताभ आमचे भारतरत्न - ममता बॅनर्जी; बिग बी यांना बांधली राखी
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन हे आमचे भारतरत्न आहेत. माझ्या अधिकारक्षेत्रात असते तर मी या आधीच त्यांना भारतरत्न किताब प्रदान केला असता. बच्चन कुटुंबीय हे नंबर वन आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले.
बॅनर्जी यांनी बिग बी अमिताभ बच्चन व कुटुंबीयांची त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली. इंडिया आघाडीच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी त्या मुंबईत आल्या आहेत.
‘इंडिया’ हाच आमचा चेहरा
इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल या पत्रकारांच्या प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इंडिया हाच आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा असणार आहे. या देशाला वाचविणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे.