अमिताभ बच्चन यांना मिळणार दोन कोटी रुपये, ओशिवरा येथील ४ कार्यालये दिली भाड्याने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 10:35 AM2023-12-31T10:35:48+5:302023-12-31T10:36:09+5:30

या कार्यालयांचे आकारमान १० हजार चौरस फूट आहे.

Amitabh Bachchan will get two crore rupees, 4 offices in Oshiwara were given on rent | अमिताभ बच्चन यांना मिळणार दोन कोटी रुपये, ओशिवरा येथील ४ कार्यालये दिली भाड्याने

अमिताभ बच्चन यांना मिळणार दोन कोटी रुपये, ओशिवरा येथील ४ कार्यालये दिली भाड्याने

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरात असलेली चार कार्यालये भाडेतत्त्वावर दिली असून, त्यांना वर्षाला २ कोटी ७ लाख रुपये मिळणार आहेत. अलीकडेच हा व्यवहार झाला असून, वॉर्नर म्युझिक इंडिया लि. या कंपनीने ही कार्यालये भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती आहे.

या कार्यालयांचे आकारमान १० हजार चौरस फूट आहे. संबंधित भाडेकरू कंपनीला १२ पार्किंग स्लॉट मिळणार आहेत. हा भाडेतत्त्वाचा करार पाच वर्षांसाठी झाला असून, चार वर्षे अमिताभ यांना २ कोटी ७ लाख रुपये भाडे वर्षाकाठी मिळणार आहे, तर पाचव्या वर्षी भाड्याची रक्कम २ कोटी ३८ लाख रुपये असेल. 

या व्यवहारासाठी अमिताभ यांनी १ कोटी ३ लाख रुपये डिपॉझिटपोटी घेतल्याचीही माहिती आहे. या व्यवहारासाठी २ लाख ८८ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. या कार्यालयांची खरेदी अमिताभ यांनी २८ कोटी ७२ लाखांना केली आहे. याच इमारतीमध्ये कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, सारा अली खान यांच्या देखील मालकीची कार्यालये आहेत.

Web Title: Amitabh Bachchan will get two crore rupees, 4 offices in Oshiwara were given on rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.