Join us  

मुंबईत कोरोना वाढीचा वेग मंदावला तरी वाढत आहे पोस्ट कोविड समस्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 4:44 PM

Corona News : सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : मुंबईत कोरोना संसर्ग वाढीचा वेग जरी मंदावला असला तरी अजूनही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ या भागात कोरोना रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी, मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टनसिंग पाळणे गरजेचे आहे. कारण पोस्ट कोविड समस्या वाढत असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.

पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णांला बरे होण्यासाठी  सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो.रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा,खोकला, कफ,अस्वस्थता जाणवते.बऱ्याचदा मायकोकार्डायटीस सारखा हृदयाचा आजार देखिल जाणवतो. डायबीटीस,हायपरटेन्शन असणाऱ्यांची लक्षणे तीव्र असतात.स्कीन रँश येणे किंवा मानसिक अस्वस्थता मोठ्याप्रमाणात आढळते अशी माहिती डॉ.दीपक सावंत यांनी दिली.

वास्तविक पाहता आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना सातव्या-दहाव्या दिवशी हॉस्पिटलमधून असॅमटॅमेटीक असल्याने रुग्णाला घरी पाठवले जाते.त्याची पुन्हा पूर्वी प्रमाणे टेस्ट निगेटीव्ह येईपर्यंत थांबवले जात नाही.त्यामुळे टेस्ट करण्याचा प्रश्न येत नाही अशी माहिती त्यांनी दिली. पण व्हायरस शेडींग म्हणजे शरीराबाहेर फेकण्याचे प्रमाण नेमके दहा दिवसांनंतर कोविड रुग्णांना पुन्हा लक्षणे दिसू लागतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे ही गोष्ट लक्षात आणून दिल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.  अश्या पोस्ट कोविड रुग्णांचा सर्व्हे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली आहे.

हा सर्व्हे टेलीफोनीक सर्व्हे सुध्दा होऊ शकतो.कारण जर पोस्ट कोविड रुग्णांचा सॅपल सर्व्हे  झाला तर खूप रुग्णांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन पासून वाचवता येईल अशी विनंती पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली असल्याचे त्यांनी  सांगितले. आता नवीन स्टडी प्रमाणे इतर लक्षणांबरोबर लहान मुलांमध्ये "कावासाकी"हा आजार देखिल मोठ्या वयाच्या व्यक्तींमध्ये दिसू लागला आहे. यामध्ये व्हस्क्युलायटीस ताप येणे,अंगावर पूरळ येणे यासारखी लक्षणे दिसतात.त्यामुळे पोस्ट कोविड रुग्णांना लग्ज फायब्रोसीस,हृदयविकार यांच्या उपचाराबरोबर मानोपसाचाराची गरज आहे. त्यासाठी पोस्ट कोविड सेंटर गरजेचे आहे अशी ही मागणी देखिल त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉकमुंबई महानगरपालिका