Join us

...आता साकी नाक्यावरची वाहतूक कोंडीही सोडवा; शोभा डे यांनी उडविली शहांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 22:20 IST

राज्यसभेमध्ये आज जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचे विधेयक 125 विरोधी 61 मतांनी मंजूर करण्यात आले.

मुंबई : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला. यानंतर देशात खळबळ माजली. विरोधाकांनी टीका केल्यानंतर सरकारच्या बाजुने सोशल मिडीयावर मिम्सनीही धमाल केली. मात्र, प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी शहा यांची खिल्ली उडविली आहे. 

राज्यसभेमध्ये आज जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचे विधेयक 125 विरोधी 61 मतांनी मंजूर करण्यात आले. या आधी या विधेयकावर चर्चा करण्यात आली. हे विधेयक उद्या लोकसभेत मांडण्यात येणार आहे. बहुमत असल्याने उद्या हे विधेयक लोकसभेतही मंजूर होण्याची शक्यता आहे. 

यावर शोभा डे यांनी ट्विटरवर शहा यांची खिल्ली उडवत तुम्ही काश्मीरचा प्रश्न पटकन सोडविलात. कृपया तुम्ही थोडा वेळ काढा आणि साकी नाक्यावरील 1947 पासून कायम असलेली वाहतूक कोंडीची समस्याही सोडवा, असे म्हटले आहे. 

यानंतर नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे शोभा डे यांना लक्ष्य करता शहा हे गृह मंत्री असल्याचे सुनावले. काही जणांनी तिला आता काश्मीरमध्येच घर घे असा सल्लाही देऊन टाकला.  

 

टॅग्स :शोभा डेकलम 370अमित शहाजम्मू-काश्मीर