थंडीसोबत मुलांमध्ये खोकलाही वाढला; काय काळजी घ्याल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:06 AM2023-12-22T10:06:49+5:302023-12-22T10:08:00+5:30

गेल्या काही दिवसांपासून शहरात गारवा वाढल्याने खोकला आणि सर्दीचे रुग्ण वाढले आहेत.

Along with the cold,cough also increased in children take preacautions | थंडीसोबत मुलांमध्ये खोकलाही वाढला; काय काळजी घ्याल ?

थंडीसोबत मुलांमध्ये खोकलाही वाढला; काय काळजी घ्याल ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात गारवा वाढल्याने खोकला आणि सर्दीचे रुग्ण वाढले आहेत. सर्वसाधारणपणे दरवर्षी डिसेंबर महिन्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असतात. दोन-चार दिवस याची लक्षणे राहतात. 

 वैद्यकशास्त्र (मेडिसिन) विभागात सध्या निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण हे खोकला आणि सर्दी तापाचे असल्याचे दिसून येत आहे. 

 या आजाराची मुंबईत मोठ्या प्रमाणात साथ आहे.

 सततच्या सर्दी आणि खोकल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.   

घरगुती उपाय काय कराल ? 

सर्वसाधारणपणे सर्दी - खोकला झाला असेल तर अनेक घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे, हळदीचे दूध प्यायल्याने अनेकदा आराम मिळतो.

Web Title: Along with the cold,cough also increased in children take preacautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.