Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘युती असो वा नसो; आगामी निवडणुकीत भगवा फडकवा!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 01:12 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युतीबाबत अजून साशंकता असताना शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युतीबाबत अजून साशंकता असताना शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी निवडणुकीत युती असो वा नसो शिवसेनेचाच भगवा फडकवा असे आवाहन शिवसेनेचे आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी कांदिवली येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले.शिवसेनेने लक्ष्य-२०१९च्या अनुषंगाने मुंबईतील १२ विभागप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच मालिकेत विभागक्र ाांक दोनचे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी चारकोप विधानसभेतील शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन कांदिवली पश्चिम येथे केले होते.यावेळी आमदार प्रभू यांनी शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करावा, असे म्हटले. तर, शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षप्रमुखांची भूमिका आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी केलेली कामे जनतेसमोर प्रभावीपणे मांडावीत, असे आवाहन केले.

टॅग्स :शिवसेनाभाजपा