Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस होणार इलेक्ट्रिक; प्रताप सरनाईकांची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 08:08 IST

वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या दरातील अस्थिरता पाहता, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला हरित ऊर्जेची जोड देणे ही काळाची गरज आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : येत्या २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व १४ हजार बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी  विधानसभेत केली. 

सभागृहात नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना सरनाईक यांनी या धोरणाची सविस्तर माहिती दिली. वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या दरातील अस्थिरता पाहता, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला हरित ऊर्जेची जोड देणे ही काळाची गरज आहे. 

या निर्णयामुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर इंधन आणि देखभाल खर्चात बचत होऊन एसटीची आर्थिक स्थितीही सुधारेल. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना विशेष कर सवलती आणि टोल माफी देण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर दर २५ किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. ही चार्जिंग स्टेशन्स सौर ऊर्जेवर चालवण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra ST Buses to be Fully Electric by 2035: Announcement

Web Summary : By 2035, all 14,000 Maharashtra State Transport buses will be electric, announced Transport Minister Pratap Sarnaik. This move aims to reduce pollution, stabilize fuel costs, and improve ST's financial health. Electric vehicle buyers will get tax benefits and toll exemptions. Charging stations every 25 km, powered by solar energy, are planned.
टॅग्स :एसटीराज्य सरकारप्रताप सरनाईक