Join us  

मुंबई, ठाणे, पनवेलमधील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत राहणार बंदच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 5:53 AM

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानूसार ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनांची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईसह ठाणे जिल्हा आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सध्या सुरू होणार नाहीत, असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आले.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानूसार ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनांची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या. ठाणे  जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना शुक्रवारी तसे निर्देश दिले. तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

राज्यात संभ्रम कायम महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. शाळांबाबत स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यामुळे सोमवारपासून शाळा नेमक्या सुरु होणार की नाहीत याबाबत राज्यात संभ्रम कायम आहे. 

प्रत्यक्ष वर्ग नसले तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नसले तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांपुढे आव्हानमुंबई : शाळा सुरु कऱण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी कोरोना उपचार केंद्रांवर शिक्षकांनी गर्दी केली आहे. चाचणी करून घेण्यासाठी शिक्षकांकडे दोन दिवस शिल्लक आहेत. सोमवारपर्यंत हजारो शिक्षकांच्या चाचण्या कशा पूर्ण होणार, याबाबत गोंधळाची स्थिती आहे.कोरोनाबाधितांचा आलेख वाढतोयकोरोनाबाधितांचा उतरता आलेख दोन दिवसांपासून वाढत  आहे. अगदी सहा दिवसांपूर्वी अडीच हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दिवसाकाठी तीन हजारांच्या आसपास घुटमळणारा हा आकडा आता सहा हजारांच्या दिशेने सरकू लागला आहे.

मुंबई-दिल्ली रेल्वे-विमानसेवा स्थगित करणार!दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होत असल्याने मुंबई-दिल्ली दरम्यानची रेल्वे आणि विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या संदर्भात अंतिम निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :शाळामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस