Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजीव सातव यांच्या श्रद्धांजली सभेत भावुक झाले सर्वपक्षीय युवा नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:27 IST

Rajiv Satav: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय आँनलाइन शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील युवा नेत्यांनी सातव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय आँनलाइन शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील युवा नेत्यांनी सातव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.राज्यातील काँग्रेस नेते, मंत्र्यांसोबतच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या खासदात सुप्रिया सुळे, बी.व्ही.श्रीनिवास, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी सातव यांच्या आठवणी जागवित त्यांची संसदीय कारकीर्द आणि व्यक्तीमत्वाचे पैलू मांडले. काँग्रेस नेते आणि मंत्री यशोमती ठाकूर, अस्लम शेख, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम यांनी सातव यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान, एक मोठे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली. कमी वयात शिखर गाठल्यानंतर देखील सातव विनम्र राहिले. त्यांचे विचार, स्मृती जिवंत ठेवणे गरजेचे आहे. उमेदीच्या वयात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही न भरून निघणारी आहे, अशी हळहळ  काँगेसच्या प्रमुख नेत्यांकडून आणि सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असल्याचेही या नेत्यांनी सांगितले.

टॅग्स :राजीव सातवकाँग्रेस