हार्बरवर सर्व बारा डबा लोकल आॅगस्टपर्यंत

By Admin | Updated: May 3, 2016 01:22 IST2016-05-03T01:22:18+5:302016-05-03T01:22:18+5:30

हार्बर मार्गावर पहिली बारा डबा लोकल धावली असतानाच या मार्गावरील सर्व लोकल बारा डबा आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नवीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याआधी जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत

All 12 bogies to Harbor on Local Harbor | हार्बरवर सर्व बारा डबा लोकल आॅगस्टपर्यंत

हार्बरवर सर्व बारा डबा लोकल आॅगस्टपर्यंत

मुंबई : हार्बर मार्गावर पहिली बारा डबा लोकल धावली असतानाच या मार्गावरील सर्व लोकल बारा डबा आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नवीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याआधी जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सर्व लोकल बारा डबा करण्यात येणार होत्या. हार्बर मार्गावर दुसरी बारा डबा लोकल आता पुढील आठवड्यात धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली.
हार्बर मार्गावर नऊ डबा लोकल १९६३ सालापासून धावत होत्या. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइनवर बारा डबा लोकल सुरू झालेल्या असतानाच हार्बर मार्गावर मात्र बारा डबा लोकल सुरू होण्यास फारच बिलंब लागला. हार्बर मार्गावर २९ एप्रिल रोजी १२ डब्यांची पहिली लोकल धावली आणि या लोकलच्या सध्या १४ फेऱ्या होत आहेत. आणखी काही बारा डबा लोकल टप्प्याटप्प्यात मध्य रेल्वेकडून सुरू केल्या जाणार असून यातील दुसरी लोकल पुढील आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यानंतर मे अखेरपर्यंत एकूण सहा लोकल बारा डब्यांच्या होतील आणि हार्बरवर बारा डब्यांच्या सर्व लोकल आॅगस्टपर्यंत केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एप्रिल महिन्यापासून बारा डब्यांच्या लोकल टप्प्याटप्प्यात हार्बरवर सुरू होणार होत्या. परंतु पश्चिम रेल्वेकडून सिमेन्सच्या बारा डबा लोकल न मिळाल्याने हार्बरवर बारा डबा लोकल सुरू करण्याचा मुहूर्त हा पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आला होता. आता दोन लोकल पश्चिम रेल्वेकडून येत्या काही दिवसांत मिळणार असून त्यापैकी एक लोकल त्वरित हार्बरवर चालविण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: All 12 bogies to Harbor on Local Harbor