Join us

VIDEO: गरज नसताना ट्रेनची चेन खेचू नका; मोटरमनला काय दिव्य करावं लागलं पाहा! धाडसाला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 11:20 IST

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपत्कालीन स्थितीत अलार्म चेनची खेचण्याची सुविधा रेल्वेनं प्रवशांना दिली आहे. पण अनेकदा प्रवाशांकडून अनावश्यकपणे चेन ओढून रेल्वे थांबविण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत.

मुंबई-

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपत्कालीन स्थितीत अलार्म चेनची खेचण्याची सुविधा रेल्वेनं प्रवशांना दिली आहे. पण अनेकदा प्रवाशांकडून अनावश्यकपणे चेन ओढून रेल्वे थांबविण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत. रेल्वेची अलार्म चेन खेचली की रिसेट करण्यासाठी रेल्वेच्या लोको पायलटला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सहाय्यक लोको पायलट आपला जीव धोक्यात घालून नदीच्या पुलावर थांबलेल्या ट्रेनची अलार्म चेन रिसेट करत असल्याचं दिसून येत आहे. 

नेमकं काय घडलं?ट्रेन 11059 गोदान एक्सप्रेसची अलार्म चेन एका प्रवाशानं खेचली आणि रेल्वे नेमकी टिटवाळा आणि खडवली स्थानकादरम्यान असलेल्या नदीच्या पुलावर थांबली. त्यानंतर सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून रेल्वेच्या चाकांमधील अवघड जागेतून आत जात नदीच्या पुलावर थांबलेल्या ट्रेनची अलार्म चेन रिसेट केली. त्यानंतर रेल्वे पुन्हा सुरू झाली. पण या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ टिपण्यात आला आणि प्रवाशांना लोको पायलट कसा आपला जीव धोक्यात टाकून काम करत असतात याची माहिती देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. तसंच अनावश्यकपणे अलार्म चेन ओढू नका असं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना करण्यात आलं आहे. 

"सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर थांबलेल्या ट्रेन 11059 गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन रीसेट केली. प्रवाशांना विनंती आहे की अलार्म चेन अनावश्यकपणे ओढू नका, ही सुविधा फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे", असं ट्विट जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केलं आहे.

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे