Akshay kumar, greetings to the martyrs of Pulwama, indebted for your supreme sacrifice | तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋृणी, पुलवामातील शहिदांना अक्षयचं अभिवादन 

तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋृणी, पुलवामातील शहिदांना अक्षयचं अभिवादन 

ठळक मुद्देदरम्यान, जम्मूमधील बसस्थानकाजवळ आज रविवारी रोजी सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटक जप्त करण्यात आले आहे.

मुंबई - पुलवामाच्या भ्याड हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण होत असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला आणि स्फोटकांनी भरलेल्या कारला धडक दिली. यानंतर सीआरपीएफच्या बसमध्ये स्फोट झाला. या अपघातात ४० सैनिक ठार झाले, तर ७० सैनिक गंभीर जखमी झाले. देशावर झालेल्या या हल्ल्यातील शहीदांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य भारतीयांनीही शहिदांना आजरांजली वाहिली. अभिनेता अक्षय कुमारनेही ट्विट करुन अभिवादन केलंय. 

अक्षय कुमारनेशहीद जवानांचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांची आठवण येत आहे. आम्ही तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋणी आहोत. अक्षय कुमारची हि पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. 8.5 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी ही पोस्ट रिट्विट केलीय. 

दरम्यान, जम्मूमधील बसस्थानकाजवळ आज रविवारी रोजी सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटक जप्त करण्यात आले आहे. सुत्रांचे म्हणणे आहे की, पुलवामाच्या भ्याड हल्ल्याच्या दोन वर्ष पूर्ण होत असून त्यापार्श्वभूमीवर दहशतवादी मोठा हल्ला करण्याचा कट रचत होते. पुलवामा दिनी पुन्हा एकदा स्फोट घडविण्याचा डाव आखण्यात आल्याचं दिसून येतंय. पण, भारतीय जवानांनी तो कट उधळून लावलाय. 

सैन्य दलाकडून व्हिडिओ शेअर 

भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ट्विटरवर 1.42 मिनिटांची व्हिडिओ क्लिप शेअर केली असून या घटनेची माहिती एकत्रित केली असून या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. क्लिपच्या शेवटी असे म्हटले आहे. 

"बिठाकर पास बच्चों को जो कल किस्से सुनाता था,
उसे किस्सा बनाने को, क्या जायज़ ये धमाका था.
पहुंचा घर जो उसके था वो ताबूत था खाली,
उठा जो उसकी चौखट से बहुत भारी जनाज़ा था.." 
ग्राफिक्स पर तैयार इस क्लिप के बैकग्राउंड में 'तेरी मिट्टी में मिल जावां, गुल बनकर खिल जावां, इतनी सी है आरजू...' गीत चल रहा है जो उसे बेहद खास और मार्मिक बनाता है.... 

२० वर्षांचा आदिल अहमद डार या हल्ल्याचा आत्मघाती बॉम्बर होता, ज्याचे घर घटनास्थळापासून १० किलोमीटर अंतरावर होते. त्या दिवशी सीआरपीएफचा चमू जम्मू ट्रान्झिट कॅम्पकडून अनंतनागकडे जात होता. मात्र, मधल्या रस्त्यावर पहाटे चारच्या सुमारास जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. 

नेटीझन्कडूनही अभिवादन

'मै ना लौटा आनेवाले साल जो, मेरी वर्दी बोले मेरा हाल, तो नैना अश्क ना हों...,' 'हम तों सारे वतन को जगा के चले, याद आयें हमारी तो रोना नहीं...,' ये तेरी जमीं, तेरे खुन सें ही तो सजती-सवरती हैं रांझे, तेरी इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती हैं रांझे...' अशा विविध देशभक्तीपर गीतांच्या ओळी दिवसभर सोशलमिडियावर ऐकवयास अन‌् वाचवयास मिळाल्या. दोन वर्षांपुर्वी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या ह्यसीआरपीएफह्णच्या जवानांच्या बलिदानाच्या स्मृती रविवारी (दि.१४) नेटिझन्सकडून ताज्या करण्यात आल्या.

व्हॅलेंटाईन विसरुन जवानांची आठवण

व्हॅलेंटाईन दिनाचे सेलिब्रेशन बाजुला ठेवत आपल्या शुरवीर जवानांच्या शहिदांच्या स्मृती जागविल्या. व्हॉटस्ॲपचे स्टेटस, डीपींमध्ये सीआरपीएफच्या जवानांना अभिवादन करण्यात आल्याचे दिसुन आले. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांमध्येही पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. रविवारी सकाळपासूनच सोशलमिडिया त्या कटु हल्ल्याच्या आठवणींनी गहिवरला होता. 'सीआरपीएफ'नेदेखील त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन शहिदांची छायाचित्रे अमर जवान ज्योतीसह पोस्ट करत शत:शत नमन केले. १४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay kumar, greetings to the martyrs of Pulwama, indebted for your supreme sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.