मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा पायलटचा वापर करून केलेला घातपात असल्याचा दावा करत याप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर बुधवारी मुंबईत तिसरी पत्रपरिषद घेतली. विमान चालवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या मालकांशी नागरी उड्डाण मंत्र्यांचे ‘मैत्रीपूर्ण’ संबंध असल्याने निष्पक्ष चौकशी होण्याबाबत शंका निर्माण होते. त्यामुळे चौकशी होईपर्यंत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांना पदावरून दूर करावे, असेही ते म्हणाले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
हे कसे शक्य आहे?
रोहित यांनी १६ सप्टेंबर २०२१ रोजी डीजीसीएने दिलेले एअरवर्थिनेस प्रमाणपत्र दाखवले. मात्र, नोंदणी प्रमाणपत्र २७ डिसेंबर २०२२ चे आहे. हे कसे शक्य आहे?
या विमानाचा ‘टाईम बिफोर ओव्हरहॉल’ संपला होता, म्हणजे इंजिनची मुदत संपलेली होती. तसेच ‘सप्लिमेंटल टाईप सर्टिफिकेट’ची अटही पूर्ण केली नव्हती, असा आरोप त्यांनी केला.
तो अमेरिकेत कसा गेला?
कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग हा सध्या अमेरिकेत गेल्याचा दावा करत, त्याला देशाबाहेर कसे जाऊ दिले, असा सवालही उपस्थित केला. अजित पवार गटाच्या नेत्यांनी घटनेनंतर २० दिवसांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, हा विलंब संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले.
पाच हजार मीटरची दृश्यमानता बंधनकारक
उड्डाणास ५ हजार मीटरची दृश्यमानता बंधनकारक असते, त्यादिवशी ३००० फुटांची दृश्यमानता असताना विमान उडायला नको होते. पहिल्या फेरीनंतर विमान मुंबईला परत आणायला हवे होते, मात्र विमान कोसळवले गेले, असा संशय व्यक्त करीत अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केले.
Web Summary : Rohit Pawar alleges Ajit Pawar's plane crash was pilot-caused sabotage, demanding investigation. He questions the plane's airworthiness, engine condition, and visibility on the day of the crash, also raising doubts about the damaged black box.
Web Summary : रोहित पवार ने आरोप लगाया कि अजित पवार का विमान दुर्घटना पायलट की वजह से तोड़फोड़ थी, जांच की मांग की। उन्होंने विमान की वायु योग्यता, इंजन की स्थिति और दुर्घटना के दिन दृश्यता पर सवाल उठाए, साथ ही क्षतिग्रस्त ब्लैक बॉक्स पर भी संदेह जताया।