Join us  

'अजित पवारांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं'; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 5:37 PM

Sharad Pawar Ajit Pawar : आज एका मुलाखतीत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

Sharad Pawar Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान, आज एका मुलाखतीत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत मोठा खुलासा केला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, २ जुलै २०२३ रोजी अजित पवार आणि आमच्या मंत्र्यांनी आताच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर १५-१६ जुलै रोजी मुंबईत शरद पवार यांची दोनदा भेट घेऊन त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि आमच्यासोबत येण्याची त्यांना विनंती केली. 

सांगलीच्या निर्णयाचा फेरविचार करावा; विश्वजित कदम यांची मविआ नेत्यांकडे मागणी

"आम्हाला तुमच्या नेतृत्वाखालीच काम करायचे आहे, असंही सांगितल्याचे पटेल यांनी सांगितलं. यानंतर पुण्यात एका उद्योगपतीच्या घरात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीतसही सोबच येण्यासाठी विनंती केली, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

"जुलै २०२३ मध्ये अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांना भाजपसोबत जायचे होते की नाही? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मुंबई बैठकीनंतर पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक झाली. कुठेतरी असे संकेत मिळतात की आमची आणि त्यांची बोलणी चालू होती आणि तेही ५० टक्के तयार होते, असंही पटेल म्हणाले.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, पवार साहेब हेच माझे नेते आहेत आणि वैयक्तिकरित्या माझे त्यांच्याशी खूप जवळचे संबंध आहेत. शरद पवार साहेब निर्णयाच्या शेवटच्या क्षणी संकोचतात. यावेळी पटेल यांनी देवेगौडा सरकार काळातील एका प्रसंगाची आठवण सांगितली.

"१९९६ मध्ये देवेगौडा सरकारमध्ये असताना आणि सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी १० महिन्यांच्या आत सरकारमधून आपला पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी देवेगौडा यांनीच मला पवार साहेबांना काँग्रेसचे नेतृत्व करण्यास सांगा, मी राजीनामा देऊन त्यांना पाठिंबा देईन असे सांगितले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षातील सर्व नेते सीताराम केसरी यांच्यावर नाराज होते आणि त्यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली असती तर कदाचित पवार साहेब पंतप्रधान झाले असते,असंही पटेल म्हणाले. 

टॅग्स :शरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसप्रफुल्ल पटेल