अजय देशमुख मुंबई विद्यापीठाचे नवे कुलसचिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 21:49 IST2019-01-14T21:48:47+5:302019-01-14T21:49:06+5:30

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांची सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड झाली.

Ajay Deshmukh, new registrar of Mumbai University | अजय देशमुख मुंबई विद्यापीठाचे नवे कुलसचिव

अजय देशमुख मुंबई विद्यापीठाचे नवे कुलसचिव

अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांची सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड झाली. प्राचार्य म्हणून विविध महाविद्यालयांत काम केलेले अजय देशमुख यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध प्राधिकरणांवर काम केलेले आहेत. यापूर्वी त्यांनी बीसीयूडी संचालकपद तसेच त्यानंतर कुलसचिवपदाचा कार्यभर यशस्वीपणे सांभाळला आहे.
अजय देशमुख यांच्या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशमुख यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी तसेच अनुभव लक्षात घेता त्यांची निवड या पदावर करण्यात आली आहे. दोन आठवड्यांनंतर ते मुंबई विद्यापीठात रूजू होणार आहेत.

Web Title: Ajay Deshmukh, new registrar of Mumbai University