ऐश्वर्याही उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल, रात्री मागविला होता पिझ्झा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 10:25 PM2020-07-17T22:25:35+5:302020-07-17T22:27:32+5:30

बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती.

Aishwarya was also admitted to Nanavati Hospital for treatment | ऐश्वर्याही उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल, रात्री मागविला होता पिझ्झा

ऐश्वर्याही उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल, रात्री मागविला होता पिझ्झा

googlenewsNext

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ अभिषेक बच्चनलाही कोरोनाचा संसर्ग झाला. सध्या नानावटी रूग्णालयात अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची तब्येत बरी आहे. अमिताभ यांची प्रकृती आता स्थिर आहे. अमिताभ आणि अभिषेक दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं  होती. तर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या होम क्वारंटाईन झाले होते. मात्र, ऐश्वर्यालाही नानावटी रुग्णायात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

अभिनेत्री ऐश्वर्यासह तिची मुलगी आराध्यालाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्याला हलका ताप आल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्या आणि आराध्या या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, आज (शुक्रवार) ऐश्वर्याला हलका ताप आला असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले . या अगोदरच ऐश्वर्या राय बच्चनचे सासरे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि तिचे पती अभिषेक बच्चन यांनाही कोरोना झाला असल्याने, उपचारासाठी नानावटी रुग्णालयातच दाखल आहेत.

बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. सुदैवाने जया बच्चन आणि ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचा पहिला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तसेच, इतर सदस्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली होती. मात्र, आता ऐश्वर्याही नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. अद्याप तिच्या कोरोना अहवालाबाबत अधिकृत माहिती नाही.  

दरम्यान, घरातच कोरोनाचा शिरकाव झाला तरीही ऐश्वर्याला मात्र परिस्थितीचे गांभिर्य दिसत नसल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री ऐश्वर्याच्या घरी पिझ्जा घेऊन एक व्यक्ती आल्याचे फोटो समोर आले आहेत. आराध्याला पिझ्झा खाण्याची ईच्छा झाली म्हणून पिझ्झा मागवण्यात आल्याची माहितीदेखील समोर येत आहे. यावरून परिस्थिती चिंतेची असूनही हवे तसे नियम पाळले जात नसून आणखीन समस्येला आमंत्रणच देणारी ही गोष्ट आहे. घरात राहून  फायदा नसून सुरक्षिततेचे नियम ऐश्वर्यानेच धाब्यावर बसवले असल्याचे प्रतिक्रीया समोर आल्या. त्यानंतर, आज ऐश्वर्या नानावटी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 

Read in English

Web Title: Aishwarya was also admitted to Nanavati Hospital for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.