धुराच्या अफवेने विमानाचे लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 23:31 IST2018-05-02T23:31:40+5:302018-05-02T23:31:40+5:30

मुंबईहून दुबईला निघालेल्या विमानाचे बुधवारी आपत्कालीन लँडिंग करावे लागल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

Air landing landing | धुराच्या अफवेने विमानाचे लँडिंग

धुराच्या अफवेने विमानाचे लँडिंग

मुंबई : मुंबईहून दुबईला निघालेल्या विमानाचे बुधवारी आपत्कालीन लँडिंग करावे लागल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. विमानाच्या कार्गो कंम्पार्टमेंटमधून धूर निघत असल्याची सूचना मिळताच दुबईला निघालेले विमान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात १७६ प्रवाशी आणि दोन कर्मचारी प्रवास करत होते. मात्र प्रत्यक्ष चौकशी केली असता, ही अफवा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईसाठी रवाना करण्यात आले.

Web Title: Air landing landing