गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान काल अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेला काही तास उलटले तोच, एअर इंडियाने आज सकाळी मुंबईहू लंडनला जाणाऱ्या विमानाला अर्ध्यातूनच माघारी बोलावून घेतले. त्यानतंर उलटसुलट चर्चांना उधाण आले. याबाबत एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
एअर इंडियाने एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, "इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही विमाने वळवण्यात आली. तर, काही विमानांना पुन्हा परतण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत एअर इंडियाने यादी जाहीर केली. या यादीत मुंबई लंडन फ्लाइट एआय १२९ विमानाचाही समावेश आहे. हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे."
एअर इंडियाने जाहीर केलेली विमानाची यादीएआय १३० - लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्नाकडे वळवलेएआय ०२- न्यू यॉर्क-दिल्ली – शारजाहकडे वळवलेएआय ११६- न्यू यॉर्क-मुंबई – जेद्दाहकडे वळवलेएआय २०१८- लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईकडे वळवलेएआय १२९- मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईकडे परतलीएआय ११९- मुंबई-न्यू यॉर्क – मुंबईकडे परतलीएआय १०३- दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीकडे परतलीएआय १०६- नेवार्क-दिल्ली – दिल्लीकडे परतलीएआय १८८- व्हँकूवर-दिल्ली – जेद्दाहकडे वळवलेएआय १०१- दिल्ली-न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे परतलीएआय १२६- शिकागो-दिल्ली – जेद्दाहकडे परतलीएआय १३२- लंडन हीथ्रो-बेंगळुरू - शारजाहला वळवलेएआय २०१६- लंडन हीथ्रो-दिल्ली - व्हिएन्नाकडे वळवलेएआय १०४- वॉशिंग्टन-दिल्ली - व्हिएन्नाकडे वळवलेएआय १९०- टोरंटो-दिल्ली - फ्रँकफर्टला वळवलेएआय १८९- दिल्ली-टोरंटो - दिल्लीकडे परतली