Join us

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत ४० टक्के वाढ होणार, एप्रिलपासून वाढीव फेऱ्यांचे नियोजन

By मनोज गडनीस | Updated: February 28, 2024 19:11 IST

एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची ही सेवा प्रवाशांकरिता उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत कंपनीच्या ताफ्यात आणखी काही नवीन विमाने समाविष्ट होणार असून त्यामुळे कंपनीला देखील या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. 

मुंबई - एअर इंडिया समुहातील कंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीने आगामी उन्हाळी सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांंमध्ये ४० टक्क्यांनी वाढ करण्याचे नियोजन केले आहे. एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची ही सेवा प्रवाशांकरिता उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत कंपनीच्या ताफ्यात आणखी काही नवीन विमाने समाविष्ट होणार असून त्यामुळे कंपनीला देखील या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. 

सध्या कंपनीच्या ताफ्यात ६९ विमाने असून त्याद्वारे दिवसाकाठी कंपनीची विमाने एकूण ३५० फेऱ्या करतात. एअर एशिया इंडिया सहयोगी कंपनीसोबत मिळून कंपनीच्या ताफ्यात एकूण १३०० वैमानिक आहेत तर सध्या ४०० वैमानिक प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे विमानांच्या फेऱ्या वाढल्या तरी त्यामध्ये अडथळा येणार नाही.

टॅग्स :एअर इंडियाविमान