Join us  

‘आरे वाचवा’च्या समर्थनार्थ दुसऱ्या दिवशी बिग बींच्या बंगल्याबाहेर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 8:28 PM

वॉचडॉग फाउंडेशनने बीग बीला पत्रातून सुनावले खडेबोल; पोलिसांनी २३ जणांना घेतले ताब्यात

ठळक मुद्देज वॉचडॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेने व सकाळी बिग बींच्या घराबाहेर निदर्शने केली. २३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मनोहर कुंभेजकरमुंबई - सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी मेट्रोची रि ओढत ट्विट केले होते. त्यामुळे काल सकाळी तरुणाईने त्यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याच्या बाहेर शांततेत निदर्शने केली होती. आज वॉचडॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेने व सकाळी बिग बींच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी गेट वेळ सून अशा घोषणा देणाऱ्या, रास्ता रोको व गोंधळ घालणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, यावेळी मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आईसा तो आदमी लाइफ में दोच टाइम बोलता है. ऑलिम्पिक का रेस हो या पोलीस का केस हो.तुम किसलीये बोलता है सर? 'असा टोला आमिताभ बच्चन यांना दिलेल्या पात्रतून खडे बोल सूनवल्याची माहिती निकोलस अल्मेडा व गॉडफ्रे पिमेटा यांनी लोकमतशी बोलताना शेवटी दिली.यावेळी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा, अँड.गॉडफ्रे पिमेटा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र शांततेत निदर्शने करून बिग बींचे निवेदन त्यांच्या सुरक्षा रक्षकांना दिले. या निवेदनात बिग बी यांना चांगलेच खडेबोल सुनावले अशी माहिती त्यांनी दिली. या मेट्रो लाईन 2 बीचा मूळ मार्ग रोड क्रमांक 10 वरून जात होता ज्यात तुमचे निवास "प्रतीक्षा" म्हणून ओळखला जातो. आपल्या निवासस्थानाचे रक्षण करण्यासाठी, आपण मूळ मार्गावर जोरदारपणे आक्षेप घेतला,पुढे, प्रतिक्षा बंगल्याजवळ रस्ता रुंदीकरणाच्या वेळी तुम्ही रोड लाईनमुळे बाधित होणारी जमीन महामंडळाकडे सोपू दिली नाही. आरेची रि ओढणाऱ्या पैलूवरील तुमचे ट्विट मागील प्रकरणात आपल्या स्वतःच्या वागणुकीशी पूर्णपणे विरोधाभास आहे.जेव्हा स्वत: ची मालमत्ता येते तेव्हा आपले नियम वेगवेगळे असतात, पण जेव्हा आरे (प्रत्येक मुंबईकरांची सार्वजनिक मालमत्ता) येते तेव्हा ते नियम वेगवेगळ्या असतात. आम्ही आपला हा विरोधाभास समजण्यास अक्षम आहोत.

 

टॅग्स :अमिताभ बच्चनआंदोलनमुंबईपोलिस