वाझे आणि काझींपाठोपाठ विनायक शिंदेही सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:07 AM2021-05-25T04:07:30+5:302021-05-25T04:07:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सचिन वाझे आणि रिसाझुद्दीन काझी पाठोपाठ ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास ...

After Waze and Qazi, Vinayak Shinde also left the service | वाझे आणि काझींपाठोपाठ विनायक शिंदेही सेवेतून बडतर्फ

वाझे आणि काझींपाठोपाठ विनायक शिंदेही सेवेतून बडतर्फ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सचिन वाझे आणि रिसाझुद्दीन काझी पाठोपाठ ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या निलंबित पोलीस अंमलदार विनायक शिंदेला अखेर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. पश्चिम परिमंडळाचे अप्पर आयुक्त यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून सोमवारी ही कारवाई केली आहे.

लखनभैया बनावट चकमकप्रकरणात विनायक शिंदे हा दोषी आरोपी होता. त्यानंतर शिंदेला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिंदेला गेल्या वर्षी मे महिन्यापासून पॅरोलवर कारागृहातून घरी सोडण्यात आले होते. अशात, हिरेन हत्या प्रकरणात शिंदेचा सहभाग उघड होताच, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुकी नरेश गोर याच्यासह शिंदेला अटक केली होती. एनआयएने हा तपास आपल्या हाती घेतल्यानंतर या दोघांनाही ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर आता सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: After Waze and Qazi, Vinayak Shinde also left the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.