Join us

बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: January 23, 2021 19:28 IST

Balasaheb Thakre jayanti : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली.

ठळक मुद्देआजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षणकाही काही क्षण असे असतात की ज्यावेळी आपण फार बोलू शकणार नाहीबाळासाहेब हे देशातील मोठे मार्गदर्शक होते. त्यांचे मार्गदर्शन कायम फायदेशीर ठरणारे

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झाले. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. काही काही क्षण असे असतात की ज्यावेळी आपण फार बोलू शकणार नाही. बाळासाहेब हे देशातील मोठे मार्गदर्शक होते. त्यांचे मार्गदर्शन कायम फायदेशीर ठरणारे आहे. बाळासाहेबांचे अनेक नेत्यांशी ऋणाणुबंध होते. आज या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते पक्षीय मतभेद विसरून उपस्थित होते त्यांचे मी आभार मानतो, अशी भावूक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, वाहतूक बेट येथे उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच इतर आघाडीचे नेते उपस्थित होते.दक्षिण मुंबईत महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनामुंबईउद्धव ठाकरे