मुसळधार पावसानंतर मुंबईतील विहार तलाव भरुन वाहू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 23:57 IST2020-08-05T23:56:35+5:302020-08-05T23:57:14+5:30
या तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर एवढी आहे. हा तलाव गतवर्षी ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव सर्वात लहान आहे

मुसळधार पावसानंतर मुंबईतील विहार तलाव भरुन वाहू लागला
मुंबई - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील विहार तलाव बुधवारी रात्री भरून वाहू लागला आहे. या तलावातून दररोज ९० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. गेल्या महिन्यात तुळशी तलाव भरून वाहिला होता.
या तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर एवढी आहे. हा तलाव गतवर्षी ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव सर्वात लहान आहे. या तलावाचे बांधकाम १८५९ मध्ये पूर्ण झाले. या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर आहे. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.