फटाक्यांनंतर आता दिवाळी पर्यटन सुरू; मुंबईकरांची पावले वळली हिलस्टेशनकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 06:48 IST2025-10-26T06:47:45+5:302025-10-26T06:48:29+5:30
कोकणासह महाबळेश्वर अशा थंड हवेच्या ठिकाणांसह तीर्थस्थळांवर मुंबईकरांची गर्दी होत आहे.

फटाक्यांनंतर आता दिवाळी पर्यटन सुरू; मुंबईकरांची पावले वळली हिलस्टेशनकडे
मुंबई : दिवाळी साजरी करून झाल्यानंतर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची पावले आता पर्यटनस्थळांकडे वळत आहेत. राज्यातील थंड हवेच्या ठिकाणांसह कोकणात अनेक मुंबईकर सहकुटुंब दाखल झाले आहेत.
दिवाळीची शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे दिवाळी साजरी करून तीर्थदर्शन व पर्यटनासाठी मुंबईकर कोकणासह महाबळेश्वर अशा थंड हवेच्या ठिकाणांसह तीर्थस्थळांवर मुंबईकरांची गर्दी होत आहे. कोकणातील निसर्गसौंदर्यासह निळाशार समुद्र पर्यटकांना भुरळ घालत असल्यामुळे पर्यटकांची अधिक पसंती समद्रकिनारी असलेल्या भागांना मिळते. रत्नागिरीतील मालगुंड, गणपतीपुळे, आरेवारे दापोली तर सिंधुदुर्गातील मालवण, देवगड हे समुद्र किनारे गेले चार दिवस पर्यटकांनी फुलले आहेत.
जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये यंदाच्या दिवाळी हंगामाची जोरदार सुरुवात झाली आहे. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीने डोंगरदऱ्या पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वर आणि तापोळा परिसरात दाखल झाले आहेत.
दररोज ४० बस दाखल
मुंबईहून दररोज ४० बसेस पर्यटकांसह महाबळेश्वरात दाखल होत आहेत. तर खासगी चारचाकी वाहनेही हजारोंच्या संख्येने पर्यटन नगरीत प्रवेश करत आहेत. परिणामी, शहरातील सर्व मुख्य मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी जाणवत आहे.
हॉटेल्स, लॉजिंग व्यवसायांना सुगीचे दिवस
पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे हॉटेल्स, लॉजिंग व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. अनेक पर्यटक एमटीडीसीच्या न्याहरी-निवास योजनेंतर्गत पर्यटन केंद्रात वास्तव्य करत
स्थानिक खाद्यपदार्थांना मागणी
पर्यटकांकडून स्थानिक खाद्यपदार्थांना वाढती मागणी आहे. तर दिवसा असलेल्या उकाड्यामुळे शहाळे, आवळा सरबत, कोकम सरबत, सोलकढीसाठी वाढती मागणी आहे.