Join us  

पवारांनंतर उद्धव ठाकरेंसोबत 'दिल की बात', 'राम मंदिर पे चर्चा' तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 7:32 PM

मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली. ऊध्दव ठाकरे यांची 'दिल की बात' राजकारण ढवळून काढेल.

मुंबई - शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमानपत्राचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे प्रणेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मुलाखत घेतली होती. एक शरद, सगळे गारद या मथळ्याखाली राऊत यांनी सामना या वर्तमानपत्रासाठी व्हिडिओ मुलाखत घेतली. त्यामध्ये महाविकास आघाडी, राज्य सरकार, कोरोनापरिस्थिती यावर पवारांनी भाष्य केलं. आता, राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची घोषणा केली आहे. 

मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली. ऊध्दव ठाकरे यांची 'दिल की बात' राजकारण ढवळून काढेल. कोरोनापासून ते राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले, असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, ही मुलाखतही शरद पवार यांच्या मुलाखतीप्रमाणेच विविध टप्प्यात पाहता येणार आहे. याच महिन्यातील 25 आणि 26 जुलै रोजी ही मुलाखत वाचता व पाहता येईल, असे राऊत यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटले आहे. 

राम मंदिर भूमिपूजनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली, राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असं काहींना वाटतं असे ते म्हणाले. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, कोरोनाची लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने, असे राऊत म्हणाले होते. त्यामुळे, कोरोना भूमीपुजनावर उद्धव ठाकरे मुलाखतीमध्ये नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या धर्तीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शुक्रवारी ‘दिल की बात’ केली. यात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर, आता दिल की बात या टॅगलाईनने शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत होत आहे, त्यामुळे हेही मोदींच्या मन की बातच्या धर्तीवरच दिल की बात असल्याचं दिसून येतंय. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाशरद पवारसंजय राऊत