Join us

हत्येनंतर चिमुरडीच्या न्यायासाठी मारेकरीच घालत होता पोलीस ठाण्यात खेपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 04:36 IST

वासनेची भूक भागविण्यासाठी आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या आणि लैंगिक अत्याचारानंतर तिची निघृण हत्या करणा-या त्या नराधमाने पोलिसांच्याही डोळ्यात धूळ फेकली.

मुंबई  - वासनेची भूक भागविण्यासाठी आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या आणि लैंगिक अत्याचारानंतर तिची निघृण हत्या करणा-या त्या नराधमाने पोलिसांच्याही डोळ्यात धूळ फेकली. चिमुरडीसाठी तिच्या नातेवाईकांसोबत तो देखील माहिम पोलीस ठाण्यात खेपा घालत होता. घटनास्थळानंतर श्वानपथकतील जॅक या श्वानाने नराधमाला अचूक हेरले़ त्याच्यामुळेच नातेवाईकांच्या गर्दीत लपलेल्या नराधम मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख (२३) पोलिसांच्या जाळ्यात अडकला.माहिमच्या रझाक मंजील समोरील पदपथावर चिऊ (नावात बदल) ही आईवडील आणि भावंडासोबत राहायची. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेखने आईच्या कुशीत झोपलेल्या चिऊला उचलून रस्त्याकडेला नेले. तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अटकेच्या भितीने त्याने तिची गळा दाबून हत्या केली.सकाळी चिऊच्या शोधासाठी धावपळ सुरु होताच, तोही त्या गर्दीत सहभागी झाला. चिऊच्या आई वडिलांसोबत माहिम पोलीस ठाण्यात गेला. तेथे पोलिसांना चिऊचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी सांगू लागला.जॅक या श्वानाने घटनास्थळावरुन आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. यावेळी जकसोबत हॅण्डलर आभास जेठे होते. जॅकने घटनास्थळापासून वेगवेगळे ठिकाण दाखवून आरोपीबाबत इशारा दिला. या ठिकाणांपैकी एक ठिकाण तो माहिम पोलीस ठाणे दाखवत होता. पोलीसही चक्रावले. वारंवार श्वान माहिम पोलीस ठाणे दाखवत असल्याने, तपास पथकाने तक्रारदारांच्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांच्या हालचालींच्या दिशेने तपास सुरु केला. अखेर शेख त्यांच्या नजरेत पडला. 

टॅग्स :गुन्हेगारी