Join us

दिवाळीनंतर आणखी रिसायकलिंग प्लास्टिकपासून बनलेले बाकडे बसवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 02:17 IST

भारतीय रेल्वेद्वारे ‘सिंगल यूज प्लास्टिक’ बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने ‘सिंगल यूज प्लास्टिक’ला तिलांजली दिली आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्लास्टिक बाटल्याचा चुरा करून रिसायकलिंग बाकडे बनविले आहेत. हे बाकडे चर्चगेट स्थानकावर असून प्रवाशांना बसण्यासाठी उपलब्ध आहेत. चर्चगेट स्थानकावर असे बाकडे ठेवण्यात आले आहेत. दिवाळीनंतर आणखी रिसायकलिंग प्लास्टिकचे बाकडे बसविले जाणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय रेल्वेद्वारे ‘सिंगल यूज प्लास्टिक’ बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने ‘सिंगल यूज प्लास्टिक’ला तिलांजली दिली आहे. स्थानकावर, लोकलमध्ये आणि एक्स्प्रेसमध्ये प्लास्टिकच्या बाटल्याचा कचरा मोठी डोकेदुखी होती. त्यामुळे स्थानकावर प्लास्टिक क्रॅशर मशीन चर्चगेट, दादर स्थानकावर बसविण्यात आली आहे. या मशीनद्वारे बाटल्यांचा काही क्षणात चुरा होतो. या चुºयाचा वापर करून रिसायकलिंग बाकडे तयार केली आहेत. हे बाक ‘बॉटल फॉर चेंज’ या प्रकल्पातंर्गत करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.असे बनविले रिसायकलिंग प्लास्टिकपासून बाकडेबॉटल फॉर चेंज या प्रकल्पातंर्गत रिसायकलिंग प्लास्टिकपासून बाकडे तयार करण्यात आले. एकदा वापर केल्या जाणाºया प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या यांचे बारीक तुकडे केले. एका मोठ्या ट्रे मध्ये प्लॉस्टिक चुरा पसरविण्यात आला. त्यानंतर या ट्रे ला भट्टीत टाकून योग्य तापमानावर गरम केले. त्यानंतर लगेच थंड करण्यात आले. या ८ बाय ४ फूटाचे बोर्ड तयार करून बाकडे तयार करण्यात आले. या एका बाकड्याला बनविण्यासाठी ४० ते ५० किलोगॅॅ्रम प्लास्टिकच्या चुºयाचा वापर केला आहे.

टॅग्स :रेल्वे