Join us  

'... म्हणून बिहार निवडणुकीनंतर, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 3:40 PM

केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्राची भूमिका राज्य सरकारविरोधी असल्याचे सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असे भाकीत एड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे

ठळक मुद्देकेंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्राची भूमिका राज्य सरकारविरोधी असल्याचे सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असे भाकीत एड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे

मुंबई : राज्यात अनलॉक 5 सुरू झालेले असले तरी, मुंबई लोकल लवकर सुरु होणार नाही, लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच, लोकलची संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, मला गर्दी नकोय, मला कोरोनाचा फैलाव नको आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे, अद्यापही राज्य सरकार अनलॉक करताना, काळजी घेत असल्याचे दिसून येत. आता, राज्य सरकारच्या या संयमी भूमिकेवरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. 

केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्राची भूमिका राज्य सरकारविरोधी असल्याचे सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असे भाकीत एड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच, सध्या देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वांचे लक्ष या निवडणूक प्रक्रियेकडे आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात बिहारमधील निवडणुकांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले. राज्य सरकारची भूमिका केंद्र सरकारविरोधी आहे. कृषी विधयेक आणि मंदिर उघडण्यासारखे केंद्राचे निर्णय राज्य सरकारने धुडकावले आहेत. राज्यघटनेनुसार राज्याला केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जात येत नाही. पण, महाविकास आघाडी सरकार केंद्रविरोधी भूमिका घेत असल्याचे सांगत आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. 

पीडित कुटुंबीयांची घेतली भेट

 प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी, हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचे दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा येथील पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणे सोपे होईल. 

अद्याप लोकल सुरू होणार नाही

राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. राज्यांतर्गंत हरिद्वारपर्यंत वाहतूक सुरू झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे. कोरोनालाही आपण पळवून लावू. मात्र त्यासाठी आपल्याला अधिक खबरदारी घ्यायला हवी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरमुंबईकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरे