२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 09:11 IST2025-09-07T09:02:42+5:302025-09-07T09:11:50+5:30

Lalbaugcha Raja Visarjan: गेले ११ दिवस उत्साहाने गणरायाची आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप दिला. दरम्यान, मुंबईतही हजारो घरगुती गणपतींसह अनेक सार्वजनिक गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

After a 22-hour procession, the Lalbaugcha Raja arrives at Girgaum Chowpatty for immersion | २२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

गेले ११ दिवस उत्साहाने गणरायाची आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप दिला. दरम्यान, मुंबईतही हजारो घरगुती गणपतींसह अनेक सार्वजनिक गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. दरम्यान, मुंबईतील लालबाग येथील प्रसिद्ध लालबागचा राजाही विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.

सुमारे २२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाची स्वारी गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. येथे लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला आहे. आता काही वेळातच गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार असून, त्यासाठी खास अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.


दरम्यान, गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, शनिवारी अनंत चतुर्दशीच्या पावसात लोक ढोल-ताशांसह आणि गुलालाच्या उधळणीसह रस्त्यावर गर्दी करून गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करत होते. मध्य मुंबईतील प्रतिष्ठित गणपती मंडळांसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग येथून यात्रेला सुरुवात झाली, ज्यामध्ये तेजुकाया, गणेश गली आणि इतर अनेक मंडळांच्या मूर्ती होत्या. विसर्जन प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, बाल गणेश मंडळाचा बल्लाळेश्वर, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, काळाचौकीचा महागणपती, रंगारी बुडक चाळ गणपती आणि तेजुकाया गणपती यासारख्या प्रसिद्ध गणपतींच्या मिरवणुका दुपारी १ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यावर पोहोचल्या होत्या. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत यापैकी काही प्रमुख गणपतींचं चौपाटीवरील खोल समुद्रात विसर्जन करण्यात आलं. तर लालबागचा राजा रविवारी सकाळी विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल झाला आहे. 

Web Title: After a 22-hour procession, the Lalbaugcha Raja arrives at Girgaum Chowpatty for immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.