तब्बल २२ महिन्यांनंतर शिवस्मारकाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:02 IST2018-10-24T05:31:13+5:302018-10-24T12:02:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ महिन्यांपूर्वी भूमिपूजन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे प्रत्यक्ष काम बुधवारपासून सुरू होत आहे.

तब्बल २२ महिन्यांनंतर शिवस्मारकाचे काम सुरू
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ महिन्यांपूर्वी भूमिपूजन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे प्रत्यक्ष काम बुधवारपासून सुरू होत आहे. भराव टाकण्याच्या कामापासून प्रारंभ करण्यात येईल. डिसेंबर २०१६ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन/जलपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर, सर्व प्रकारच्या परवानग्यांचे अडथळे पार करण्यात आले. २,५८१ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाच्या उभारणीचे कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. राजभवनापासून सव्वा किलोमीटर आत समुद्रातील खडकावर हे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.