Join us

Mumbai: मुंबईत आफ्रिकन नागरिकाचा चौघांवर ब्लेडने हल्ला, हायकोर्टाजवळ घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 19:29 IST

Mumbai: घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मुंबई: राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आफ्रिकन नागरिकाने चार जणांवर ब्लेडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफ्रिकन वंशाच्या नागरिकाला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

आरोपी ड्रग्सच्या नशेतही घटना मुंबई उच्च न्यायालयाजवळ घडली आहे. तिथे एका आफ्रिकन वंशाच्या नागरिकाने अचानक आसपासच्या लोकांवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तेथे उपस्थित लोकांनी कसेबसे आरोपीवर नियंत्रण मिळवले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने लोकांवर ब्लेडने हल्ला केला तेव्हा तो ड्रग्जच्या नशेत होता, असे सांगितले जात आहे.

हल्ल्याचे कारण अस्पष्टआरोपीला ताब्यात घेऊन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून, तो नशेत होता का, याचा तपास केला जात आहे. आरोपीने लोकांवर ब्लेडने का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :मुंबईपोलिस