दहिसरमध्ये लाखोंचा भेसळयुक्त गुटखा पकडला
By गौरी टेंबकर | Updated: October 26, 2023 19:04 IST2023-10-26T19:02:52+5:302023-10-26T19:04:03+5:30
दहिसर पश्चीमच्या प्रमिला नगर परिसरात एम एच बी कॉलनी पोलिसांनी सापळा रचत एका टेम्पोसह १५.८९ लाखांचा गुटखा हस्तगत गेला.

दहिसरमध्ये लाखोंचा भेसळयुक्त गुटखा पकडला
मुंबई : दहिसर पश्चीमच्या प्रमिला नगर परिसरात एम एच बी कॉलनी पोलिसांनी सापळा रचत एका टेम्पोसह १५.८९ लाखांचा गुटखा हस्तगत गेला. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सुर्यकांत पवार व पथक हे ७ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सबंधित टेम्पोमधून प्रतिबंधित गुटखा साठा मुंबईमध्ये विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार त्यांनी रंजनकुमार राममदन सहानी (२९) याला अटक केली.
तर त्याचे साथीदार शौकत, दिपक आणि फैसल हे पसार असून ते काशिमिरा, गोरेगाव तसेच कांदिवलीचे राहणारे आहेत. अटक आरोपी भिवंडीचा राहणारा असून त्याच्यावर काशिमीरा आणि बिहारच्या बचीवारा पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले. प्रतिबंधित गुटख्याच्या ३० गोणी आणि सात बॉक्स तसेच टेम्पो मिळून एकूण २५ लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याचेही त्यांनी नमूद केले.