आदित्य यांचा एल्गार! ठाकरे गटानं ताकद दाखवली; गर्दी, घोषणा अन् मुंबईत घोंगावलं भगवं वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 17:09 IST2023-07-01T17:07:30+5:302023-07-01T17:09:56+5:30

Aditya Thackeray Mumbai Morcha: आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात मुंबईत महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा धडक मोर्चा निघाला आहे.

Aditya Thackeray Mumbai Morcha Thackeray group showed strength Crowds slogans near mumbai bmc headquarter | आदित्य यांचा एल्गार! ठाकरे गटानं ताकद दाखवली; गर्दी, घोषणा अन् मुंबईत घोंगावलं भगवं वादळ

आदित्य यांचा एल्गार! ठाकरे गटानं ताकद दाखवली; गर्दी, घोषणा अन् मुंबईत घोंगावलं भगवं वादळ

मुंबई-

मुंबई महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज मुंबई धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असतानाही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. 

धडक मोर्चात ठाकरे गटाचे महत्वाचे नेते देखील सहभागी झाले आहेत. यात खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई यांच्यासह सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर या महिला नेत्या देखील उपस्थित आहेत. मुंबई मनपाच्या मुख्यालयाजवळच एक व्यासपीठ उभारण्यात आलं असून या व्यासपीठावरुन आदित्य ठाकरे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. आदित्य ठाकरे यावेळी आपल्या भाषणातून मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मेट्रो सिनेमाजवळ आदित्य ठाकरे मोर्चात सगभागी होताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. 'मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. तसंच कार्यकर्त्यांच्या हाती असलेल्या भगव्या झेंड्यांमुळे भर पावसात भगवं वादळ आल्याचं चित्र आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

 

Web Title: Aditya Thackeray Mumbai Morcha Thackeray group showed strength Crowds slogans near mumbai bmc headquarter