दहिसर नदीचे पुनर्जीवन, डीपी रोड खुले करण्यासाठी आदित्य ठाकरे सरसावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 09:36 PM2020-02-17T21:36:05+5:302020-02-17T21:36:53+5:30

Aditya Thackeray : दहिसर नदीला जिवंत करण्यासाठी गुजरातच्या साबरमती नदीच्या धर्तीवर पर्यटनाच्या दृष्टीने या नदीचे सुशोभिकरण व पुनर्जीवन करा

Aditya Thackeray moved to Revival to Dahisar river | दहिसर नदीचे पुनर्जीवन, डीपी रोड खुले करण्यासाठी आदित्य ठाकरे सरसावले 

दहिसर नदीचे पुनर्जीवन, डीपी रोड खुले करण्यासाठी आदित्य ठाकरे सरसावले 

Next

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई - दहिसर नदीचे पुनर्जीवन,वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डीपी रोड, मिसिंग लिंक लवकर सुरू करणे मुंबईचे पर्यावरण आणि पर्यटन आणि पश्चिम उपनगरातील अन्य महत्वाचे विषय लवकर मार्गी लावण्यासाठी राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरेआदित्य ठाकरे सरसावले आहेत.

दहिसर नदीला जिवंत करण्यासाठी गुजरातच्या साबरमती नदीच्या धर्तीवर पर्यटनाच्या दृष्टीने या नदीचे सुशोभिकरण व पुनर्जीवन करा, दहिसर नदीच्या कडेला रिव्हर फेस्टिव्हल भरवा अशी आग्रही मागणी, आज रिव्हर मार्चने राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केेेली.

या बैठकीत पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे, रिव्हरमार्च या संस्थेचे कर्नल ऊन्नी, गोपाळ झवेरी, महेश थवानी, तेजस शाह, पंकज त्रिवेदी, राजेश शाह, शांता नायडू, उपेन शाह मनपा अधिकारी, विधी व न्याय समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे उपस्थित होते.

उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी दिंडोशी ते कांदिवली -लोखंडवाला ,वर्सोवा आदर्श नगर ते मालाड,आरे कॉलनी ते हे विविध रस्त्यांच्या कामांना गती देणे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाहनतळ सुरू करून येथे इलेक्टिक बस -इलेक्टिक कार सुरू करून खाजगी वाहनांना बंदी घालणे, येथील आदिवासींना सेवा सुविधा पुरवून त्यांची पर्यायी वय व्यवस्था करणे, मुंबतील झाडांचे गुगल मॅपिंग करणे या विविध विषयांवर महत्त्वाची चर्चा झाली. आदित्य ठाकरे यांनी लवकरच या विविध महत्त्वाच्या विषयांवर लवकर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका आयोजित करून सदर प्रश्न मार्गी लावले जातील, अशी सकारात्मक भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली अशी माहिती रिव्हर मार्चचे गोपाळ झवेरी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

या बैठकीत पालिकेच्या विधी व न्याय समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले. मुंबईतील महत्त्वाच्या नदीपैकी दहिसर ही महत्त्वाची नदी असून, तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. ती बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पाऊन ती मीरा-भाईंदर खाडीला मिळते. मात्र या नदीत गृहनिर्माण सोसायटी आणि झोपडपट्टीचे सांडपाणी मिसळल्याने ती प्रदूषित व मृत झाली आहे. या नदीत प्राणवायूचा स्तर कमी झाल्याने यामध्ये कोणतेही वनस्पती व जलचर आढळत नाही. या नदीत आजूबाजूच्या गोठ्यांमधून मोठ्या प्रमाणात शेण टाकले जात असंल्याने या परिसरात दुर्गंधी पसरते, अशी माहिती निवेदनाद्वारे यावेळी शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना दिली.

Web Title: Aditya Thackeray moved to Revival to Dahisar river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.