Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य यांनी दिल्लीत घेतली शाह यांची भेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 07:22 IST

यावेळी केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता.

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. 

यावेळी केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता. आम्ही मात्र युतीधर्म पाळला. त्यामुळे आम्हाला त्यांच्या टीकेचे काही वाटत नाही.  त्यांचे जे कोण राजपुत्र (आदित्य ठाकरे) वगैरे बोलतात, ते मुळात स्वतःकडे काय आहे ते बघून बोलत असतात. नुकतीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ती भेट कशासाठी होती हे संपूर्ण जनतेला माहिती आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेअमित शाह