मुंबई : बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष, आ. अमित साटम आमने-सामने आले आहेत. घुसखोरांचा विषय केंद्र आणि राज्याच्या गृह खात्याचा असल्याचे सांगत ठाकरेंनी महापौर रितू तावडे यांच्यावर उपरोधिक टिप्पणी केली, तर साटम यांनी महापौरांची बाजू घेत ठाकरेंना टोला हाणाला.
मुंबईतील रस्त्यावरील खड्डे, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे, प्रदूषित पाणी व हवा अशा मूलभूत नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच घुसखोरीचा विषय हा केंद्र व राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो, असे नमूद करत त्यांनी भाजपला सवाल केला की, दशकभर केंद्रात सत्ता असताना बांगलादेशी नागरिक देशात कसे घुसले आणि विविध भाजपशासित राज्यांतून मुंबईत कसे पोहोचले? इतकी वर्षे ते येथे कसे राहिले? हे गुप्तचर यंत्रणेचे की प्रशासकीय अपयश, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
पालिकेत असताना त्यांनी कोणती ठोस कामे केली?
अमित साटम यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना महापालिकेत सत्ता असताना त्यांनी कोणती ठोस कामे केली, हे स्पष्ट करावे, असे आव्हान दिले.
बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत महापालिकेत बैठक घेण्यात आली
असून जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत दिली जातात, याची माहिती आदित्य ठाकरे यांना नसावी, असा टोला लगावला.
भाजप नागरी व सुरक्षाविषयक प्रश्नांवर ठोस भूमिका घेत असल्याचेही साटम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा वाद आणखी काही दिवस पेटत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Web Summary : Aditya Thackeray and Amit Satam clashed over Bangladeshi infiltrators, questioning central government's role. Thackeray criticized BJP's inaction, while Satam challenged Thackeray's past performance in the municipality. The dispute is likely to escalate.
Web Summary : आदित्य ठाकरे और अमित साटम बांग्लादेशी घुसपैठियों पर भिड़ गए, केंद्र सरकार की भूमिका पर सवाल उठाया। ठाकरे ने भाजपा की निष्क्रियता की आलोचना की, जबकि साटम ने ठाकरे के नगरपालिका में पिछले प्रदर्शन को चुनौती दी। विवाद बढ़ने की संभावना है।