Join us  

देशासह राज्यातील ७० टक्के भागात मान्सून पोहोचला, पण मुंबापुरी अद्यापही तहानलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:11 AM

एका अर्थाने देशासह राज्यात पुरेसा पाऊस होत असताना मुंबापुरी मात्र तहानलेलीच आहे.

मुंबई : देशातील ७० टक्के भागात निर्धारित वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला असून, आतापर्यंत १९१ जिल्ह्यात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. १ ते २२ जून या कालावधीत महाराष्ट्रात ४९ टक्के  पावसाची नोंद झाली असून, मिलीमीटरमध्ये ही नोंद १९३.८ इतकी आहे. तर मुंबई शहरात ८ आणि उपनगरात उणे २ टक्के एवढ्या पावसाची नोंद आहे. एका अर्थाने देशासह राज्यात पुरेसा पाऊस होत असताना मुंबापुरी मात्र तहानलेलीच आहे.मान्सूनने देशाच्या ७० टक्के भाग व्यापला आहे. दक्षिण आणि पूर्वोत्तर राज्यांनंतर मान्सून आता मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशात सक्रीय झाला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहारमध्ये सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ६० टक्के अधिक पाऊस झाला आहे. १ जून ते २३ जून या काळात देशातील ६८१ जिल्ह्यांपैकी २८ टक्के म्हणजे १९१ टक्के जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. २३ टक्के जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत २० ते ५९ टक्के पाऊस झाला. मध्य प्रदेशासह पूर्व उत्तर प्रदेशात मान्सून एक आठवड्यापूर्वी दाखल झाला आहे.पूर्वोत्तर राज्यांत मान्सून दाखल होण्यास पाच दिवस अधिकलागले. मान्सून आणि मान्सून पूर्व पावसाचा विचार करता देशातील ५१ टक्के जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक, तर २६ टक्के जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत कमी पाऊसझाला आहे.>ईशान्य भारतात पुराची शक्यतामुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, २५ ते २८ जून या काळात मान्सूनचा पाऊस हिमालयाच्या पायथ्याशी सरकण्याची शक्यता आहे.ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज असून, पूर येण्याची शक्यता आहे. याच काळात मध्य भारतात पावसाचे प्रमाण कमी होईल. उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतात अद्यापही मान्सूनला सुरुवात झालेली नाही.

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेट