रविकिरण बालनाट्य स्पर्धेत 'अडलंय का'चे निर्भेळ यश; ५ पुरस्कारांसह पटकावला प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:29 IST2025-12-18T13:20:59+5:302025-12-18T13:29:01+5:30

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली.

'Adalay Ka' a resounding success in the Ravikiran Children's Drama Competition; won first place with 5 awards | रविकिरण बालनाट्य स्पर्धेत 'अडलंय का'चे निर्भेळ यश; ५ पुरस्कारांसह पटकावला प्रथम क्रमांक

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत 'अडलंय का'चे निर्भेळ यश; ५ पुरस्कारांसह पटकावला प्रथम क्रमांक

मुंबई : सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत कल्याण येथील वरपच्या सेक्रेड हार्ट स्कूलच्या 'अडलंय का' या बालनाट्याने पाच पुरस्कारांवर नाव कोरत प्रथम क्रमांक पटकावला. 'दिव्या खाली दौलत' दुसरे, तर 'रंग जाणिवांचे' हे नाटक तिसरे आले.

माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमधील दोन दिवसांच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या प्रथम पारितोषिकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाश योजना असे पाच पुरस्कार 'अडलंय का'ने पटकावले.

१९ दर्जेदार बालनाट्यांमुळे स्पर्धेत चुरस; विविध पुरस्कारांनी गौरव

१९ दर्जेदार बालनाट्यांनी या स्पर्धेत चुरस निर्माण केली. सर्वोत्कृष्ट बालनाट्य, लेखन व दिग्दर्शनाच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुस्कारावर दिंडी 'झ' प्रतिष्ठान'च्या 'दिव्या खाली दौलत'ने नाव कोरले तर सर्वात्कृष्ट अभिनय व लेखनाच्या प्रथम पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय बालनाट्य व दिग्दर्शनासह उत्तेजनार्थ अभिनेत्रीचा सन्मान मुक्तछंद नाट्य संस्थेच्या 'रंग जाणिवांचे'ला मिळाला. अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या 'सर्कस' या बालनाट्यास स्पेशल ज्युरी अवॉर्डने गौरवण्यात आले.

सामाजिक योगदानाबद्दल केला विशेष सत्कार

रविकिरण मंडळाची ही स्पर्धा यंदा मंडळाचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि कोकणातील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली. मंडळाचे ज्येष्ठ सभासद अशोक परब यांचा कलाक्षेत्रातील कार्याबद्दल आणि हेमंत चव्हाण यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल विशेष सत्कार केला.

या स्पर्धेच्या निकालासाठी विशेष २ अतिथी म्हणून दीपक राजाध्यक्ष आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. अभिनेते प्रमोद पवार, नारायण जाधव, महेंद्र पवार, विनोद पवार यांसह दिग्गज कलावंतांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली.

Web Title : रविकिरण बालनाट्य प्रतियोगिता में 'अडल्य का' शीर्ष पर, पुरस्कारों की बौछार।

Web Summary : रविकिरण बालनाट्य प्रतियोगिता में कल्याण के 'अडल्य का' ने पांच पुरस्कारों के साथ प्रथम स्थान प्राप्त किया। 'दिव्या खाली दौलत' और 'रंग जाणिवांचे' ने भी पुरस्कार जीते। प्रतियोगिता मनोहर नगरकर को समर्पित थी।

Web Title : 'Adlay Ka' triumphs at Ravikiran Children's Drama Competition with top honors.

Web Summary : Kalyan's 'Adlay Ka' secured first place with five awards at the Ravikiran Children's Drama Competition. 'Divya Khali Daulat' and 'Rang Janivanche' followed. Nineteen plays competed, honoring contributors like Manohar Nagarkar and Ashok Parab.