माजी व्यवस्थापकाविरोधात अभिनेत्री झरीन खानची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 05:51 IST2018-12-08T05:51:40+5:302018-12-08T05:51:47+5:30

माजी व्यवस्थापक अंजली अथा हिने फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप अभिनेत्री झरीन खान हिने केला आहे.

Actress Zarine Khan's complaint against ex-manager | माजी व्यवस्थापकाविरोधात अभिनेत्री झरीन खानची तक्रार

माजी व्यवस्थापकाविरोधात अभिनेत्री झरीन खानची तक्रार

मुंबई : माजी व्यवस्थापक अंजली अथा हिने फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप अभिनेत्री झरीन खान हिने केला आहे. या प्रकरणी तिने शुक्रवारी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंजली ही झरीनकडे गेल्या तीन ते चार वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करीत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत झरीनकडेच फारसे काम नसल्याने तिने याबाबत अंजलीला स्पष्टपणे सांगून नवीन नोकरी शोधण्याची विनंती केली होती. तरीदेखील अंजली तिच्यासोबतच काम करीत राहिली. नंतर पगारावरून या दोघांत वाद होऊ लागले. तेव्हा अंजली ही झरीनला कधी फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या द्यायची तर कधी तिला अपमानजनक संदेश पाठवायची. याला कंटाळून अखेर झरीनाने शुक्रवारी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंजलीने तिला पाठविलेले संदेश तसेच फोनवर दिलेल्या धमक्यांचे रेकॉर्डिंग तिने पोलिसांना दिल्याचे कळते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तक्रारींमधील तथ्य पोलीस पडताळून पाहत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Actress Zarine Khan's complaint against ex-manager